Blog Details


शिवरामा`चा नाश्ता... एकदम मस्त... !


आहारशास्त्रानुसार सकाळच्या न्याहारीला किंवा नाश्त्याला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरवातच भरपेट ब्रेकफास्टने व्हायला हवी. आजकाल शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायानिमित्त अनेकांवर एकटे राहण्याची वेळ येते. या काळात सर्वात अधिक गैरसोय होते ती खाण्या-पिण्याची. दुपारच्या जेवणासाठी मेसचा पर्याय असतो पण सकाळच्या नाश्त्याचे काय...?


दररोज तेच ते खाऊन अनेकदा कंटाळाही येतो. अशा वेळी काहीतरी चमचमीत खावेसे वाटते. औरंगाबाद शहरात आता रुचकर आणि स्वादिष्ट नाश्त्याची सोय केली आहे, `शिवरामा नाश्ता सेंटर`ने. सर्वप्रकारची काळजी घेऊन `शिवरामा नाश्ता सेंटर`मध्ये स्वच्छ वातावरणात पदार्थांची निर्मिती केली जाते. सकाळी सकाळी काही चांगलं आणि दर्जेदार खायची इच्छा झाली तर `शिवरामा नाश्ता सेंटर`ला अवश्य भेट द्या...! इथल्या सर्वच पदार्थांची चव आपल्या जिभेवर दिवसभर टिकून राहील.


शिवरामा नाश्ता सेंटर`ने ग्राहकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. येथे गरमागरम पोहे तर मिळतातच, त्यावर असतो झक्कास रस्सा. मसालेदार खिचडी... त्यावरही रस्सा.. स्पाईसी फूड आवडणाऱ्यांना तर हे नक्कीच आवडेल.
यूथ लोकांचा आवडीचा टॉपिक कोणता असेल तर तो वडापाव. `शिवरामा`चा वडापाव भलताच लोकप्रिय झाला आहे. वडापावच्या सोबतीला चटणी. ही जोडी हाती पडली की दिल खूश...!


शिवरामा नाश्ता सेंटर`ची खासियत लपलीय ती येथे मिळणाऱ्या ऑम्लेट-पावमध्ये. अंड्याचे भन्नाट ऑम्लेट येथे मिळते. सकाळी सकाळी काही तरी पौष्टिक आणि सकस खायचं काय, तर या मग `शिवरामा नाश्ता सेंटर`वर.
शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळच `शिवरामा नाश्ता सेंटर` आहे. आजकाल या नावाची भलतीच चर्चा सुरू आहे खवय्ये लोकांमध्ये. लोकांची गरज आणि मिळणारा प्रचंड प्रतिसाद ओळखून `शिवरामा नाश्ता सेंटर` आता ऑनलाईन झाले आहे. फोनच्या एका क्लिकवर तुम्ही घरपोच नाश्ता मागवू शकता...!

मग वाट कसली पाहता...! 

उचला फोन आणि करा ऑर्डर...!!!